esakal | क्या बात है! शेतकरीपुत्राची गगनभरारी; बनला पोलिस उपनिरीक्षक;अख्ख्या गावात फटाक्‍यांची आतषबाजी 
sakal

बोलून बातमी शोधा

सतीशचे प्राथमिक शिक्षण पुसद येथे झाले आहे. बारावीनंतर त्यांनी दारव्हा येथील मुंगसाजी विद्यालयात डी.एड केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आहे.

सतीशचे प्राथमिक शिक्षण पुसद येथे झाले आहे. बारावीनंतर त्यांनी दारव्हा येथील मुंगसाजी विद्यालयात डी.एड केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आहे.

क्या बात है! शेतकरीपुत्राची गगनभरारी; बनला पोलिस उपनिरीक्षक;अख्ख्या गावात फटाक्‍यांची आतषबाजी 

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील आरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी माणिकराव ठेंगे यांचा मुलगा सतीश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्याच्या या यशाने गावात फटाक्‍यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

सतीशचे प्राथमिक शिक्षण पुसद येथे झाले आहे. बारावीनंतर त्यांनी दारव्हा येथील मुंगसाजी विद्यालयात डी.एड केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आहे. 2012 मध्ये महाराष्ट्र पोलिस शिपायाची परीक्षा दिल्यानंतर  पोलिस शिपाई म्हणून नांदेड येथे रुजू झाले. पोलिस खात्याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत त्यांनी हे यश संपादन केले आहे.

हेही वाचा - ‘मतदान का केले नाही, तुमच्यामुळे आम्ही सरपंच होऊ शकलो...

पोलिस दलामध्ये दैनंदिन कामकाज, कोरोना कालावधी व निवडणूक बंदोबस्त या कठीण काळातही वेळात वेळ काढून परीक्षेसाठी अभ्यास व तयारी करून सतीश ठेंगे यांनी हे यश मिळवले आहे. 

त्याच्या यशाबद्दल पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. आरेगाव या मूळ गावी फटाक्‍यांची आतषबाजी व पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गावकरी व विविध सामाजिक संघटना यांनी सतीश ठेंगे यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा - डोक्याला मार लागलेली आई विश्‍वासच ठेवायला तयार नव्हती...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमुळे होतकरू तरुणांना प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची उत्तम संधी मिळू शकते. निश्‍चित ध्येय आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही चांगले यश मिळविता येते. 
- सतीश ठेंगे
पोलिस उपनिरीक्षक, आरेगाव.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image