बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

शेलसूर (जि. बुलडाणा) - चार महिन्यांपूर्वीच तरुण मुलाचा झालेला अपघाती मृत्यू, मुलीचे लग्नाचे वय, बॅंकेचे थकीत कर्ज आणि कोसळलेले शेतमालाचे दर या विवंचनांना कंटाळून चिखली तालुक्‍यातील धोत्रा भनगोजी येथील बाबूराव शेगोळ (वय 42) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.28) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. शेगोळ यांच्यावर स्टेट बॅंकेचे कर्ज होते. या कर्जाची कशी परतफेड करावी, या विवंचनेत ते होते. या व कौटुंबिक नैराश्‍यातून त्यांनी आत्महत्या केली.
Web Title: farmer suicide in buldhana district