शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन

शिरजगाव कसबा (जि. अमरावती) : चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा गावातील युवा शेतकरी सचिन दादाराव मते (वय ४३) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना ११ नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजता घडली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिरजगाव कसबा येथे भेट देऊन मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे शेतीचा खर्चही निघत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत होता. यंदाही संत्रा विक्रीतून पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना संत्रा गळण व नेहमीपेक्षा भाव कमी झाल्यामुळे केवळ पंधरा हजार रुपयेच मिळाले. उत्पन्नापेक्षा तिप्पट खर्च असल्याने कर्जाचा डोंगर वाढता पाहून सचिन मते चिंतित होते.

कुटुंबातील वृद्ध वडील व पत्नीचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आत्महत्या करण्याच्या दिवशी सचिन एकटेच घरी होते. पत्नी भाऊबीजेनिमित्त माहेरी गेली होती व वडील दवाखान्याच्या औषध उपचारासाठी अमरावती येथील नातेवाइकांकडे होते, अशी माहिती शिरजगाव कसबा पोलिसांनी दिली. मते प्रहार संघटनेचे शाखाप्रमुख होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिरसगाव कसबा येथील मते यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.