शेतकरी श्यामराव भोपळे यांनी संपविली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

श्यामराव यांनी स्वतःला जाळून घेतले होते. त्यामध्ये ते 90 टक्के भाजले होते. सर्व प्रथम त्यांना ग्रामीण रुग्णालय, उमरखेड तेथे दाखल केले परंतु प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामूळे त्यांना नांदेड येथे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मागील 7 दिवसापर्यंत त्यांनी मृत्यूला झुंज दिली.

मार्लेगाव (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) : मार्लेगाव येथील शेतकरी श्यामराव रामा भोपळे (वय 68) यांनी कर्जबाजारी व शेती उत्पादित मालाला भाव मिळत नाही. म्हणून रविवारी रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेतले होते. अखेर शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

श्यामराव यांनी स्वतःला जाळून घेतले होते. त्यामध्ये ते 90 टक्के भाजले होते. सर्व प्रथम त्यांना ग्रामीण रुग्णालय, उमरखेड तेथे दाखल केले परंतु प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामूळे त्यांना नांदेड येथे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मागील 7 दिवसापर्यंत त्यांनी मृत्यूला झुंज दिली. प्रकृती दिवसेदिवस चिंताजनक होत होती, त्यात आज शुक्रवारी रात्री 01:30 च्या सुमारास श्यामराव रामा भोपळे यांचा मृत्यू झाला. प्राथमिक स्तरावर पोलिस पंचनाम्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: farmer suicide in yavatmal