गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नेर (जि. यवतमाळ), ता. 19 : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील मांगूळ येथे शुक्रवारी (ता. 19) सकाळी उघडकीस आली.
गणेश नारायण जाधव (वय 40, रा. मांगूळ), असे मृताचे नाव आहे.

गणेश रात्रीदरम्यान घरून शेतात गेले. सकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. शेतातच कडुनिंबाच्या झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जाधव यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यांच्यावर मांगलादेवी युनियन बॅंकेचे 60 हजारांचे कर्ज आहे. मृतापश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
शेतमजुरानेही संपविले जीवन
वडकी (जि. यवतमाळ) : राळेगाव तालुक्‍यातील उमरेड येथील प्रमोद रामकृष्ण मडावी (वय 25) या शेतमजुराने गावालगत असलेल्या जवादे यांच्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. तो पिंपळापूर येथील देवीदास बरडे यांच्याकडे शेती कामासाठी होता. सकाळी कामावर गेला. मात्र, दुपारी उमरेड येथे घरी येत असताना एकदरम्यान त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides by hanging