कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

साकोली (जि. भंडारा) : तालुक्यातील उकारा येथील युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर नीलकंठ तवाडे (वय 28) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रामेश्वर यांच्याकडे वडीलोपार्जित शेती आहे. त्याच्यावर बँकेचे व खासगी एक लाखांचे कर्ज आहे. मागील वर्षभरापासून कर्जाची परतफेड करता न आल्याने त्याने सोमवारी (ता. 19) शेतातील झाडाला गळफास घेतला. गळफास घेतल्याचे लक्षात येताच साकोली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides by paying down debt

टॅग्स