शेतातील पेटता ऊस बघून शेतकऱ्याने केले विषप्राशन

The farmer toxicity by looking at sugarcane in the fire Conditions
The farmer toxicity by looking at sugarcane in the fire Conditions

यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील चार एकर शेतातील उसाला शेतातून गेलेल्या विजतारामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला. त्यामुळे उभा पेटता ऊस पाहून सदर शेतकऱ्याने स्वतः विष घेतले. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी घडली असून, दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सुजित रमेश दहेकर (वय 40) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. यामध्ये शेतकऱ्याचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी बुधवारी (ता.७) ही घटना घडली. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. मांगलादेवी येथील सुजित रमेश दहेकर यांच्याकडे सात एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरात ऊस लावला होता. उसाला बारा महिने झाले असून, तो काढणीला आला होता. बुधवारी सकाळी साडेअकरादरम्यान उसाला आग लागली. त्यामध्ये चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दहेकर यांनी दिली.

सदर प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन देणार असून, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर त्यांनी घर जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तातडीने नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथून यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महावितरण जबाबदार

सुजित दहेकर यांच्या शेतातून 11kv च्या विजेच्या तारा गेल्या आहेत. यात झंपरला पार्किंग होऊन आग लागली. त्यामुळे ऊस पेटला. याला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचे शेजारील शेतकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com