esakal | बोंडअळीमुळे शेतकरी त्रस्त, पाच एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

farmer turned tractor over cotton crop in five acre in gadchandur of chandrapur

सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. गेल्यावर्षी मर रोगाचा कापसावर प्रादुर्भाव होता. परंतु, त्यावर शासनाकडून पाहणी करण्यात आली. यंदा बोंडअळीमुळे उभ्या पिकावर नागर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे.

बोंडअळीमुळे शेतकरी त्रस्त, पाच एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर

sakal_logo
By
दिपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर): राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरपना  तालुक्यात अमलनाला धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाच एकर शेतीत शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालविले आहे.

बोंडअळीने गडचांदूरसह अनेक गावातील हजारो शेतकऱ्यांची धुळीस मिळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 25 ते 30 हजार रुपये प्रति एकरी खर्च आलेला आहे. परंतु, पीक जोमात असताना आणि कापूस वेचणीला आला असताना गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

हेही वाचा - 'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'

सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. गेल्यावर्षी मर रोगाचा कापसावर प्रादुर्भाव होता. परंतु, त्यावर शासनाकडून पाहणी करण्यात आली. यंदा बोंडअळीमुळे उभ्या पिकावर नागर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणीसोबतच अंमलबजावणी व आर्थिक मदत देण्याची सुद्धा गरज आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापसाचे पीक जोमात येत नाही. जेमतेम उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. कोणत्याही फवारणीने बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आता बोंडअळीमुळे उभ्या पिकांवर ट्रक्टर फिरविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली असून गडचांदूर येथील शेतकरी सुभाष एकरे यांनी चक्क पाच एकरावरील कापसावर ट्रॅक्टर फिरविला आहे. 

हेही वाचा - चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य...

यंदा चांगले पीक येऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा होती. परंतु, बोंडअळीने कापूस हातचा गेला. त्यामुळे आमचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले आहेत. 
-सुभाष एकरे शेतकरी, गडचांदूर

शासनाने संपूर्ण जिल्ह्यातील कापसाचे सर्व्हे करून बोंडअळीसाठी तत्काळ मदत जाहीर करायला हवी.
-मनोज भोजेकर, शेतकरी, गडचांदूर