
पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ 4 पथके पाठविली होती. अशातच ते शिरजगावकसबा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी दिसले. त्यामुळे कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
शिरजगाव (जि, अमरावती) : देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुखदेव सुने (वय ४०) हे सोमवारी (ता. ११) रात्रीपासून बेपत्ता झाले होते. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी घरात सापडल्याने देऊरवाडा व शिरजगावकसबा येथील त्यांच्या नातेवाइकांसह परिसरात खळबळ उडाली होती.
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ 4 पथके पाठविली होती. अशातच ते शिरजगावकसबा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी दिसले. त्यामुळे कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
विजय सुने यांची पत्नी वैशाली यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अब्दागिरे यांनी श्री. सुने यांचा शोध घेण्यासाठी 4 पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. त्यांनी शेगाव, दर्यापूर, अंजनगाव आदी ठिकाणी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडून आले नाही. अशातच विजय सुने हे बुधवारी (ता. १३) शिरजगावकसबा येथीलच एका हॉटेलमध्ये दिसून आल्याचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी सांगितले.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
पोलिसांनी श्री. सुने यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले, की मी शेतीप्रकरणाला घेऊन तणावात होतो. त्यामुळे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो, अशी माहिती ठाणेदार परदेशी यांनी दिली. तथापि, संपूर्ण चौकशी करून विजय सुने यांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ