बुलडाणा - खारपानपट्ट्यात गुलाबी बोंड अळीमुळे भितीचे वातावरण

पंजाबराव ठाकरे
शुक्रवार, 27 जुलै 2018

संग्रामपूर (बुलडाणा) : खारपानपट्ट्यात गुलाबी बोंड अळीचे आगमन झाल्याने कापूस उत्पादकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या वर्षी बोंड अळीच्या नुकसानीची भरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नाही आणि यंदा पुन्हा अळ या मुळे शेतकरी वर्गात एकच खलबत सुरू आहे. तर स्थानिक कृषी विभागाचे कर्मचारी गाव पातळीवर जाऊन फेरोमन ट्रॅप बाबत मार्गदर्शन करत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील उकडगाव शिवारात केशव पांडुरंग गायकवाड याचे तीन एकर कपाशी क्षेत्रात 27 जुलै रोजी पाती मध्ये गुलाबी बोंड अळी दिसून आली. या अळीने पातीचे भरपूर नुकसान केल्याचेही शेतकऱ्याने सांगितले . सदर शेतकऱ्याने मे महिन्यात तीन एकर कपाशी मोठ्या आशेने लागवड केली. मेहनत करून मशागतीचा खर्च करून सद्यस्थितीत कपाशीचे पीक फुल पातीवर आले आहे. अशातच पातीमध्ये गुलाबी बोडं अळीने थैमान घातले आहे. या शेतात अळी पाहून आजूबाजूचे शेतकरी धास्तावले आहेत. 

या संदर्भात माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सवडतकर यांनी तातडीने कृषी सहाय्यक असंबे यांना सदर शेतकर्याचे शेतावर पाठवुन गुलाबी बोडं अळी निर्मूलन बाबत उपायाचे मार्गदर्शन करण्याचे सांगितले . सोबतच इतर शेतकऱयांनी कपाशी क्षेत्रात फेरोमन ट्रॅप लावून बोडं अळीचे आगमन होऊ नये यासाठी उपाय करावे . हे ट्रॅप कृषी केंद्रावर अल्प दरात शासनाने उपलब्ध करून दिले आहेत.असे आवाहन ही कृषी अधिकारी सवडतकर यांनी सकाळच्या माध्यमातून केले आहे.

Web Title: farmers afraid of pink boll worm in buldana