
मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. शेतकर्यांनी तासभर रस्ता अडवून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
महागाव (जि. यवतमाळ) : सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे करून शेती व्यवस्था कार्पोरेट लॉबीच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप आहे. हे काळे कायदे मागे घेण्यासाठी मागील 70 दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता.6) महागाव बसस्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे
मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. शेतकर्यांनी तासभर रस्ता अडवून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांनाही मनःस्ताप सहन करावा लागला. राष्ट्रीय किसान मोर्चा, किसान युवा क्रांती संघटना, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. नागोराव पाटील कदम, मनीष जाधव, प्रमोद जाधव, किशोर नगारे, आशीष गावंडे, अमोल गावंडे, सलिम भाई, अमोल आवटे, रियाज पारेख, सागर डोगरे, अविनाश राठोड, अॅड. पवन धरणकर व शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.