esakal | ‘विकेल ते पिकेल’ : शेतकरी राजेशने सुरू केला केळीच्या चिप्सचा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

‘विकेल ते पिकेल’ : शेतकरी राजेशने सुरू केला केळीच्या चिप्सचा व्यवसाय

‘विकेल ते पिकेल’ : शेतकरी राजेशने सुरू केला केळीच्या चिप्सचा व्यवसाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अपयश आल्यास माणूस निराश होतो आणि यशाचा पाठलाग करणे सोडून देतो. पहिल्याच प्रयत्नात आपल्याला कोणतेही यश मिळाले पाहिजे, अशी मानसिकता झाली आहे. काही ध्येयवेडे माणसे याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येते. केळीचे उत्पन्न घेत असताना सतत दोन वर्षे हाती निराशा आली. त्यामुळे खचून न जाता बागेची योग्य निगा राखली. तिसऱ्या वर्षी भरघोस उत्पन्न आले. केळीविक्रीसह प्रक्रिया उद्योगही शेतकऱ्याने उभारला आहे. ही यशोगाथा आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्‍यातील हरसूल येथील प्रगतिशील शेतकरी राजेश सवने यांची... (Farmers-Business-Banana-chips-Processing-industry-including-banana-sales-Yavatmal-News-nad86)

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीक घेतले जाते. सिंचन सुविधा असणारे शेतकरी रब्बीत गहू, हरभरा पिकांचे उत्पन्न घेतात. मात्र, काही शेतकरी धाडस करून फळबाग लागवडीकडे वळले आहेत. त्यातून अनेकांना आर्थिक उन्नतीची वाट गवसली आहे. हरसूल येथील राजेश सवने यांनी तीन वर्षांपूर्वी शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. पहिल्या वर्षी उन्हाच्या तीव्रतेने बाग वाचविण्यात ते अपयशी ठरले. त्यांना जवळपास सहा लाखांचे नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा: अकोला : आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट

दुसऱ्या वर्षी केळीचे गड कापणीला येत नाही तोच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. केळीचे बाराशे रुपयांवर असलेले भाव गडगडून तीनशे रुपयांवर आले. त्यामुळे खचून न जाता तिसऱ्या वर्षी जिद्द, चिकाटी व मेहनतीने योग्य त्या उपाययोजना करून केळीची बाग फुलविली. केळी परिपक्व होत असतानाच नियोजन करून केळीवर आधारित प्रक्रिया करून खुल्या बाजारात केळीबरोबर त्याचे पदार्थ तयार करून विकायचे ठरविले.

केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वतः विक्री केली. त्यात जेमतेम पैसे मिळू लागले, पण हे मर्यादित असल्याने त्यांनी कच्च्या केळीपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. चिप्सची माफक दरामध्ये विक्री सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी धोरणानुसार ‘विकेल ते पिकेल’अंतर्गत त्यांनी हा विक्री व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला त्यांना प्रतिसादही मिळत आहे. त्यांच्या या व्यवसायातून अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. त्यांची ही धडपड इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा: हुंड्यासाठी छळ : ‘तुझ्या वडिलांनी फक्त पाच ग्रॅमची अंगठी दिली’

अनेकांनी दिला रोजगार

काही वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. नापिकामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अशा कठीणप्रसंगी राजेश यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे. त्यांच्या व्यवसायाला भरभराटीस येत आहे. राजेश सवने यांनी सुरू केलेल्या प्रक्रिया प्रकल्पाला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. एवढेच नव्हे तर राजेश यांनी अनेकांनी रोजगारही दिला आहे.

खुल्या बाजारात केळीविक्री सोबतच कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता अत्यंत माफक दरात केळीपासून चिप्स व्यवसायाची सुरुवात केली आहे. मोठमोठ्या कंपन्या जास्त दर आकारतात. अगदी माफक दरात विक्री करायचे ठरवले आहे. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. शिवाय अनेकांना रोजगारही मिळाला आहे.
- राजेश सवने, शेतकरी, हरसूल

(Farmers-Business-Banana-chips-Processing-industry-including-banana-sales-Yavatmal-News-nad86)

loading image