नेर : शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मांडली व्यथा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, कपाशीचे पीक उद्‌ध्वस्त झाले. शासनस्तरावर तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज, बुधवारी नेर येथील शेतकऱ्यांनी केली. दरम्यान आज विमा कंपनीचे अधिकारी हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत आपली व्यथा कृषी अधिकारी तथा तहसीलदारांकडे मांडली.

तीन दिवसांच्या सलग अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक तसेच कपाशीची बोंडे सडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दिवाळीत कृषी व महसूल विभाग सुट्टीवर असल्यामुळे विहित वेळेत तक्रारी होऊ शकल्या नाही. नियमानुसार नुकसानाच्या 48 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीकडे लेखी तक्रार करणे क्रमप्राप्त आहे. परंतु तालुक्‍याला असलेला विमा कंपनीचा व्यक्ती हजर नसल्यामुळे व सलग सुट्टी असल्यामुळे विहित वेळेत शेतकरी तक्रार करू शकले नाही. त्यामुळे आज तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांनी कृषी विभागात धाव घेतली. कृषी विभागात संबंधित विमा कंपनीचा प्रतिनिधी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला. शेतकऱ्यांनी लगेच तालुका दंडाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली. यावेळी तालुका कृषी अधिकारी नामदेव कुमरे व नायब तहसीलदार नरेंद्र थोटे उपस्थित होते. संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व तहसीलदारांना धारेवर धरत त्वरित सरसकट पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांना 
कुजलेले सोयाबीन तसेच कपाशीचे बोंडे दाखवत भीषण अवस्था दाखवली. आज प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers complain to the tehsildar