esakal | ...अन् रात्रीचे नऊ वाजताच शेतकरी धवातात टॉर्च, लाठ्याकाठी, रेनकोट घेऊन
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् शेतकरी धवातात टॉर्च, लाठ्याकाठी, रेनकोट व ताट घेऊन

...अन् शेतकरी धवातात टॉर्च, लाठ्याकाठी, रेनकोट व ताट घेऊन

sakal_logo
By
अभिजीत घोरमारे

भंडारा : शेती हा जोखमीचा व्यवसाय आहे, असे अनेकजण म्हणतात. कारण, यात गुंतवलेले पैसे परत मिळेलच हे सांगू शकत नाही. दुष्काळ, आसमामी व सुलतानी संकटाचा शेतकरी सामना करतच असतो. याशिवाय त्यांना विविध संकटांनाही तोंड द्याव लागते. यात वन्यजिवांपासून शेतीचे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरते. अशाच समस्येचा सामना भंडारा जिल्ह्यातील खरबी गावातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. (Farmers-Crop-protection-Bhandara-district-news-Wildlife-plagues-farmers-nad86)

भंडारा तालुक्यातील नागपूर जिल्हा लगत राष्ट्रीय महामार्ग सहावर खरबी हे गाव बसलेले आहे. गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या जवळपास आहे. गावातील ९९.९९ टक्के लोक शेती करतात. दिवसभर शेतकरी शेतात राबराब राबतात. दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्रीचे झोप आवश्यक असते. मात्र, रात्रीचे नऊ वाजले गावात एकच लगबग सुरू होते. दिवसभर शेतात काम करणारे खळबळून जागे होतात आणि शेतीकडे धाव घेतात.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

शेतकरी टॉर्च, लाठ्याकाठी, घोंगसी (रेनकोट) घेऊन शेताकडे पळू लागतात. कारण, शेतकऱ्यांच्या शेतात रात्री वन्यप्राणी आपला मोर्चा वळवतात. जवळ जवळ ५० ते शंभर हरणाचा कळप तर कधी रानडुक्करांचा झुंड शेतात शिरूर सोयाबीन, तूर पिकांची नासाडी करतात. रानडुक्कर तर चक्क शेतातील पीक उपटून जागो जागी खड्डे करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

डोळ्यादेखत पिकांचे होणारे नुकसान पाहून बळीराजा हतबल झाला आहे. दिवसभर घाम गाळून, कर्ज घेऊन उभे केलेले पीक वाचविण्यासाठी खरबी गावातील शेतकरी रात्रभर जागरण करीत असतात. सकाळी सहा वाजता उठून दिवसभर शेतात राबतात व सायंकाळी सहा वाजेपर्यंत काम करीत असतात. घरी जाऊन जेवण करीत झोपत नाही तर पुन्हा तीन तासांनी शेतीकडे धाव घेतात आणि वन्य प्राण्यांना हुसकावून लावतात. कधी आरडाओरड तर कधी ताट वाजवून जिवाचा आकांत करीत वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करीत असतात.

तारांचे, सौर कुंपण लावून देण्याची मागणी

हा आटापिटा केवळ खरबी गावाचाच नाही तर चिखली, खमारी आदी गावातील शेतकरीसुद्धा करीत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस या समस्येबरोबरच सरपटणारे प्राणी यांच्यापासूनही जागरण करण्याऱ्या शेतकऱ्यांना बचाव करावा लागतो. काहीवेळा तर जंगली डुक्करांसोबत दोन हात करावे लागते. यामुळे खरबी गावातील अनेक शेतकरी गंभीर जखमीही झाले आहेत. हिंस्र प्राण्यासह पिकांची नासधूस करणाऱ्या प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतात तारांचे कुंपण व सौर कुंपण लावून देण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

शेतकरी मेटाकुटीला

जिल्ह्याचे मुख्य पीक हे धान पीक आहे. मात्र, आसमानी व सुलतानी संकट बघता जिल्हातील शेतकरी आता तूर, सोयाबीन, चणा या नगदी पिकांकडे वळले आहेत. पीक उत्तम येईल व दोन पैसे जादा पडेल या आशेवर हे पीक शेतात लावले खरे, मात्र; वन्य प्राण्यांच्या नासधुशीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी करीत आहे. खरबी गावातील शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठीची धडपड बघता जगणे किती कठीण’ या उक्तीची प्रचिती येते.

(Farmers-Crop-protection-Bhandara-district-news-Wildlife-plagues-farmers-nad86)

loading image