esakal | VIDEO : आता नरभक्षी वाघाला ठार माराच, शेतकरी संघटनेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

farmers demand to killed the tiger in rajura of chandrapur

आतापर्यंत वाघाने दहा लोकांचा बळी घेतल्याने वाघाला  जेरबंद करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (19 ऑक्टोबर)दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.

VIDEO : आता नरभक्षी वाघाला ठार माराच, शेतकरी संघटनेची मागणी

sakal_logo
By
गजानन ढवस/ आनंद चलाख

चंद्रपूर : जिल्ह्यातील विरुर स्टेशन, राजुरा व कोठारी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या वाघाने आतापर्यंत दहा शेतकरी व शेतमजूर यांचा बळी घेतला आहे. या परिसरात वाघाची दहशत असून शेतकरी दुपारीच शेतातून घरी परत येत आहेत. त्यामुळे शेतातील कामे करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाघाला पकडणे शक्य नसेल तर त्याला ठार मारावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यासाठी शेतकरी संघटनेने विरुर स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

आतापर्यंत वाघाने दहा लोकांचा बळी घेतल्याने वाघाला  जेरबंद करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (19 ऑक्टोबर)दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. या नरभक्षक वाघाने मनुष्य आणि अनेक पशुधनाचे बळी घेतले असून आता नागरिकांच्या व त्यांच्या पशुधनाच्या जीवितास प्राधान्य देऊन नरभक्षी वाघाला ठार करण्याची परवानगी विभागाला मिळणे आवश्यक आहे. राजुरा व विरुर स्टेशन येथील नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार करून, निवेदने देऊन शासनाकडे व वनखात्याकडे या वाघाला ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी केली. याशिवाय या आंदोलनाद्वारे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला वन विभागात नोकरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा पोलिसांचीच इभ्रत पणाला; जामिनावर सुटताच चोराने नाकावर टिच्चून ठाण्यासमोरून चोरून नेला ट्रक

याशिवाय साप हा वन्यप्राणी असल्यामुळे साप चावून मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने याबाबत निर्णय घ्यावा. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटप, मधुकर चिंचोलकर, बळीराम खुजे, कपिल ईद्दे, महादेव मोरे, देवराव जीवतोडे, श्रीनिवास कलगुंरी आदींनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.