esakal | "साहेब, सगळे दिवाळी साजरी करताहेत, आमचं काय?" फुलांचा योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा सवाल   
sakal

बोलून बातमी शोधा

farmers did not get price for flowers from businessmen

परतीच्या पावसामुळे इतर पिकांसोबतच फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दसऱ्यापासून फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ती दरवाढ दिवाळीतही कायम आहे.मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. 

"साहेब, सगळे दिवाळी साजरी करताहेत, आमचं काय?" फुलांचा योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा सवाल   

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : दिवाळीला झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. त्यानिमित्त शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहेत. यंदा फुलांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. झेंडूचे दर प्रतिकिलो दोनशे ते अडीचशे रुपये किलोवर पोहोचलेले आहेत. दर वाढल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

परतीच्या पावसामुळे इतर पिकांसोबतच फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दसऱ्यापासून फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ती दरवाढ दिवाळीतही कायम आहे.मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. 

अधिक वाचा - सायंकाळी ५.३९ ते ८.३० या वेळेत करा लक्ष्मीपूजन; सर्वोत्तम मुहूर्त

दिवाळीच्या पूर्वसंध्येला फुलांचे दर दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ग्राहकांना फुले घेताना पहिल्यांदाच खिशाला मोठा चटका बसला. दसरा व दिवाळी या सणांना झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. वाहनांची पूजा तर तोरणापर्यंत फुलांचाच वापर अधिक होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी या दोन सणांना झेंडूची फुले असतातच. 

यंदा मात्र, दरवाढ झाल्याने केवळ फुल वाहूनच पूजा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. फुलांचे दर बाजारात वाढले असले तरी यांचा फायदा शेतकऱ्यांना कमीच झालेला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत फुले घेतलीत. विक्री करताना दरात वाढ केली. शुक्रवारी (ता.13) सकाळी बाजारात फुलांचे दर शंभर ते दीडशे रुपये प्रतिकिलोपर्यंत होते.

सविस्तर वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई 

दुपारनंतर किमतीत वाढ झाली. फुलांचे दर दोनशे, अडीचशे तर स्टेट बॅंक चौकात तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले. भाव वाढल्याने ग्राहकही अवाक झालेले आहेत. या वर्षी झेंडूचे उत्पादन कमी असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ