
प्रत्यक्ष उत्पादन पाच वर्षांनंतर सुरू होणार असल्याने त्यांनी फक्त देखभाल सुरू ठेवली. यावर्षीपासून उत्पादन सुरू झाले असून ते उत्पादन विक्रमी ठरत आहे. लिंबाचे उत्पादन 35 वर्ष चालणार असून शेणखत व मजुरी, असा पन्नास हजार रुपये खर्च आहे, तर चार लाखाचे उत्पादन झाले आहे.
सेलू (जि. वर्धा) : पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत बोरी (कोकाटे) येथील प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून लिंबाची शेती फुलविली आहे. याच लिंबाच्या झाडापासून तब्बल ३५ वर्ष त्यांना उत्पादन मिळणार असून यंदा ४ लाखांचे उत्पादन झाले आहे. कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते, असा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.
हेही वाचा - वाहनासमोर सारस आले अन् घडला मृत्यूचा थरार, बापासमोरच मुलगा ठार
सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथील पंढरी जुगनाके यांनी बोरी बोरधरण शिवारातील शेतीमध्ये तांत्रिक मार्गदर्शन व योग्य नियोजन करून लिंबाची लागवड केली. पारंपरिक शेती व रासायनिक खताचा वापर न करता नवनवीन तंत्रज्ञानानुसार नियोजन केले. पंढरी जुगनाके यांच्याकडे १७ एकर जमीन आहे. तूर, कपाशी, सोयाबीन अशी पारंपरिक शेती करताना उत्पादन खर्च व उत्पादन याचा ताळमेळ बसत नव्हता. शेतीमध्ये वारेमाप रासायनिक खताचा वापर होत असल्याने जमिनीचा पोत तर बिघडतच होता व उत्पादन खर्चही वाढत होता. त्यामुळे शेतीवरील खर्च कमी करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा विचार केला. यातूनच शेणखताचा वापर करून लिंबाच्या झाडांची निवड केली. हा प्रयोग तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. सेलू तालुक्यात लिंबूवर्गीय फळाचे पीक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.
हेही वाचा - जागते रहो...गडचिरोली शहराच्या वेशीवरच आले वाघ!
प्रत्यक्ष उत्पादन पाच वर्षांनंतर सुरू होणार असल्याने त्यांनी फक्त देखभाल सुरू ठेवली. यावर्षीपासून उत्पादन सुरू झाले असून ते उत्पादन विक्रमी ठरत आहे. लिंबाचे उत्पादन 35 वर्ष चालणार असून शेणखत व मजुरी, असा पन्नास हजार रुपये खर्च आहे, तर चार लाखाचे उत्पादन झाले आहे. लिंबाच्या पिकाला वन्यप्राणी व माकडांचा त्रास नसल्याने पिकांचे नुकसानही टळले आहे.
हेही वाचा - VIDEO : मोहन भागवत यांनी मा. गो. वैद्य यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन, म्हणाले '...
सहा एकराला 35 हजारांचा खर्च -
शेतकरी पंढरी जुगनाके यांनी 2013 मध्ये सहा एकर जमिनीची निवड करून 500 रोपट्यांची लागवड केली. यानंतर 2015 मध्ये पुन्हा पाचशे झाडांची लागवड केली. यासाठी संपूर्ण खर्च 35 हजार रुपये आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा त्यांना चार लाखाचे उत्पादन झाले आहे.