सावनेरात शेतकऱ्यांचा "एल्गार'

सावनेर: आमदार सुनील केदार उपविभागीय अधिकारी मेहत्रे यांना निवेदन देताना. बाजूला नायब तहसीलदार चैताली दराडे.
सावनेर: आमदार सुनील केदार उपविभागीय अधिकारी मेहत्रे यांना निवेदन देताना. बाजूला नायब तहसीलदार चैताली दराडे.

सावनेर (जि.नागपूर):सततच्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मका, संत्रा, मोसंबी व सोयाबीन पिकाला जबर फटके बसले आहेत. कपाशीच्या पिकांच्या पात्या व बोंडे गळत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. यंदा शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा तातडीने सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता.1)उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी तालुक्‍यातील असंख्य शेतकऱ्यांचा जमावडा लागला होता. या त्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुनील केदार यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी मेहत्रे यांना निवेदन दिले
गत चार पाच वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे उदासीन धोरण, वाढती मजुरी, खत व बियाणे यामध्ये झालेली भाववाढ आणि अधूनमधून येणारा दुष्काळ, यामुळे शेती परवडत नसल्याचे निराशजनक चित्र तालुक्‍यात निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे अगोदरच आर्थिक कंबरडे मोडले असताना यंदाच्या खरीप हंगामात उत्तम उत्पादनाची आस ठेवून मुलाबाळांप्रमाणे पिकांची जोपासना करणारा कष्टकरी शेतकरी सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची स्थिती बघून नैराश्‍येत आहे. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करावे आणि तातडीने अहवाल शासनाला पाठवून नुकसानाचा मोबदला मिळावा, यासाठी तालुक्‍यातील त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी "एल्गार' पुकारत समस्या स्थानिक आमदार सुनील केदार यांच्या पुढे मांडल्यानंतर शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मेहेत्रे यांना निवेदन सोपविले.
यावेळी नायब तहसीलदार चैताली दराडे, जि. प. माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, पवन जैस्वाल, मनोज बसवार, रवींद्र चिखले, सतीश लेकुरवाळे, गोविंदा ठाकरे, सुनील डाखोळे, शंकर मोवाडे, अनिल राय, सरपंच केदार, बोद्यनाथ डोंगरे, चंदू बनसिंगे, योगेश मालापुरे, संजय गोडबोले, किरण निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com