शेतकऱ्यांचे कुटुंब अपघात विमा योजनेपासून वंचित, तीन वर्षांत फक्त १६१ प्रस्ताव मंजूर

farmers family deprived of accidental insurance scheme in amravati
farmers family deprived of accidental insurance scheme in amravati

अमरावती : शेतात काम करीत असताना घडलेल्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास शेतकऱ्याच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. गेल्या तीन वर्षांत मात्र विमा कंपनीने असे प्रस्ताव फेटाळण्यातच अग्रक्रम मिळवला असून 330 प्रस्तावांपैकी केवळ 161 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 49 प्रस्ताव फेटाळण्यात आले असून 75 मध्ये त्रुटींचे कारण दाखविण्यात आले आहे.

अपघाती मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक आधार मिळावा यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतात काम करताना वीज पडून मृत्यू होणे, सर्पदंश, विजेचा धक्का बसणे, पूर व विंचूदंश यासह इतर अपघातांमुळे मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास आर्थिक सहकार्य देण्यात येते. यासाठी शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य विमाधारक खातेदार असावा व त्याचे वय 10 ते 75 असावे, अशी अट आहे. प्रस्ताव दाखल करताना सातबारा दाखला, मृत्यूचा दाखला, पोलिसांतील एफआयआर, घटनास्थळ पंचनामा व वयाचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे. मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयाची मदत देण्याची तरतूद आहे.

2017-18 पासून 330 प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी 161 प्रस्ताव कंपनीने मंजूर केले. विमा कंपनीकडून मोबदला देताना विविध त्रुट्या काढण्यात येतात व अधिकाधिक प्रस्ताव नामंजूर कसे करता येतील, असाच प्रयत्न केला जातो, अशा तक्रारी शेतकरी कुटुंबीयांकडून आल्या आहेत. वर्षनिहाय पाठविण्यात आलेले प्रस्ताव व मंजुरी यांचा तुलनात्मक आलेख बघितल्यास विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहकार्य देण्यात हात आखडता घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही आहे प्रस्तावांची स्थिती -
2017-18 मध्ये 83 प्रस्ताव पाठविण्यात आले, त्यापैकी 66 मंजूर करण्यात आले. 2018-19 मध्ये 89 पैकी 54 व 2019-20 मध्ये 158 प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यातील फक्त 41 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com