शेतकऱ्यांना परदेशी नेणारे ‘विमान’ उडेना !

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

परदेश दौरा हा प्रत्येकासाठीच एक अानंददायी क्षण असतो. शेतकऱ्यांसाठी तर तो खासच असतो. कारण शेतीचे विदेशात चाललेले प्रयोग पाहून अापणही काही बदल करू शकतो यासाठी शेतकरी परदेश दौऱ्याला तयार होतात. सन 2017-2018 यावर्षात बुलडाणा जिल्ह्यातून 96 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पात्र ठरलेले असून विदेशवारीवर जाण्यासाठी तयार असलेल्या या शेतकऱ्यांचे ‘विमान’ मात्र अद्याप काही उडू शकलेले नाही. नेमके घोडे कुठे अडले याचे कारणही त्यांना मिळालेले नाही. साहेबांचा फोन येईल...आणि अापणही एक दिवस विमानात बसून परदेशात जाऊ अशी अपेक्षा हे शेतकरी बाळगून अाहेत. 

बुलडाणा- परदेश दौरा हा प्रत्येकासाठीच एक अानंददायी क्षण असतो. शेतकऱ्यांसाठी तर तो खासच असतो. कारण शेतीचे विदेशात चाललेले प्रयोग पाहून अापणही काही बदल करू शकतो यासाठी शेतकरी परदेश दौऱ्याला तयार होतात. सन 2017-2018 यावर्षात बुलडाणा जिल्ह्यातून 96 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पात्र ठरलेले असून विदेशवारीवर जाण्यासाठी तयार असलेल्या या शेतकऱ्यांचे ‘विमान’ मात्र अद्याप काही उडू शकलेले नाही. नेमके घोडे कुठे अडले याचे कारणही त्यांना मिळालेले नाही. साहेबांचा फोन येईल...आणि अापणही एक दिवस विमानात बसून परदेशात जाऊ अशी अपेक्षा हे शेतकरी बाळगून अाहेत. 

जगात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे सर्वच क्षेत्रात वाहत आहेत. शेतीही त्याला अाता अपवाद राहलेली नाही. त्यामुळे अापल्या शेतकऱ्यांनीही उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता, शेत मालाचा दर्जा सुधारणे, कृषी प्रक्रियेकडे वळणे, उत्पादीत केलेल्या मालाचे ग्रेडिंग, प्रतवारी, साठवणूक, पॅकेजिंग करून एक चांगला ब्रॅंड तयार करण्याकडे वळावे असा सल्ला दिला जातो. पिकवलेल्या मालाचे विपणन चांगल्या पद्धतीने करावे यासाठी त्याला भर द्यायला सर्वच तज्ज्ञ सांगत असतात. ही अाधुनिकीकरण अापल्यात अाणण्यासाठी, जगात शेती क्षेत्रात काय नवीन सुरु अाहे, त्याची ओळख होण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आयोजित केले जातात. या दौऱ्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव दिला. मात्र नोव्हेंबरपासून निवड झालेल्या शेतकऱ्यांचे अद्याप ‘विमान’ काही उडालेले नाही.

दौऱ्यासाठी इच्छूक असलेले शेतकरी कधी तालुक्याला, कधी जिल्हयाला याबाबत विचारणा करतात. काही जण तर थेट पुण्यापर्यंत चौकशी करून अाले. शासनाच्या कृषी विभागाकडून निवडलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्पेन, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, इस्राईल, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अादी देशात जाण्यास परवानगी राहते. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाते. सन 2017-2018 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात अाले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 98 शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले. छानणीनंतर 96 प्रस्ताव पात्र ठरले. नोव्हेंबर 2017 मध्येच हे प्रस्ताव कृषी अायुक्तालयाकडे पाठवण्यात अाल्याची माहिती अाहे. त्यावर पुढे काहीही झालेले नाही.

Web Title: farmers foreign tour problem