कोदामेंढी/ मौदा : शेतातील घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. शेतकऱ्यानेही प्रतिकार केला. मात्र, बिबट्याला परतवून लावणे अशक्य ठरले. त्याचवेळी शेतकरी घरात आला आणि पत्नीने प्रसंगावधान राखत दार बंद करून घेतल्याने जीव वाचला..रविवारी सकाळी साडेसहा वाजता खंडाळा पिपरी (ता. मौदा) शिवारात ही घटना घडली. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. कैलास परसराम गभने (वय ३९) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ‘एक क्षण उशीर झाला असता, कदाचित वाचलोही नसतो, असे सांगत गभणे यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक हल्ल्याचा अनुभव कथन केला. .सकाळी साडेसहा वाजता अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी कुलरवर ठेवलेला गिझर काढला आणि खुर्ची हातात घेतली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रथम छातीवर हल्ला केला. गभने यांनी खुर्ची आडवी करताच पाठीवर आणि डोक्यावर जखमा केल्या. ओरडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेल्या पत्नीने दार उघले. .दाराचा आवाज ऐकून बिबट्या काहीसा मागे सरला. हीच संधी साधून गभने आत गेले आणि पत्नीने दार लावून घेतले. छाती व पठीशिवाय गभने यांच्या डोक्यावर पाऊण इंच खोल जखम झाली आहे. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. गभने यांनी धानला येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तिथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले..माहिती मिळताच वनरक्षक डी. आर. डोंगरे, वनरक्षक योगेश अंबाझिरे, एस. टी. अडमाची, एस. एस. सहारे पोहोचले. पळून जाणारा बिबट्या परिसरातील चार ते पाच जणांना दिसला. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चिचोली, बोरगाव, सिंगोरी आणि एनटीपीसी परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला. तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..पुन्हा हल्ल्याची भीतीया घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. बिबट्याला मानवी रक्ताची चटक लागण्याने तो पुन्हा हल्ला करील अशी भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बिबट्या एकाच ठिकाणी राहत नाही, रात्रभर दीडशे किलोमीटर भटकंती करतो, यादरम्यान तो कुणावरही हल्ला करू शकेल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे..दार उघडून हिटर सुरू करायला गेलो, त्यावेळी कुलरजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याला काहीसा प्रतिकार केला. पण, बिबट्याचा हल्ला परतविणे शक्य होत नव्हते. त्याचवेळी पत्नी मदतीला धावून आली. तिने दार बंद केले नसते, तर काय झाले असते, ते सांगता येत नाही.-कैलास गभणे,.जखमी शेतकरी, खंडाळा पिपरी.जखमीला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले. आमचे कर्मचारीही सोबत आहेत. अद्याप त्यांच्याकडून काही माहिती आली नाही.-राहुल शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, रामटेक..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.