कोरोनाचे संकट : ‘महाकृषी’कडे शेतकऱ्यांची पाठ

कोरोनाचे संकट : ‘महाकृषी’कडे शेतकऱ्यांची पाठ

यवतमाळ : कृषिपंपांच्या थकित विजबिलाची वसुली व्हावी (Recovery of overdue electricity bill), यासाठी महावितरणने महाकृषी अभियान (Mahakrishi Abhiyan) सुरू केले. त्यात व्याज व दंड माफ करण्यात आले होते. थकबाकीमुक्त होण्यासाठी ही मोठी संधी होती. मात्र, सोळाशे शेतकऱ्यांनीच योजनेत सहभाग घेतला. शेतकऱ्यांची इच्छा असूनही कोरोनाच्या (Corona) संकटामुळे ते शक्‍य झाले नसल्याचे दिसत आहे. (Farmers neglect of Mahakrishi Yavatmal district news)

कृषिपंपाच्या विजबिलाची थकीत रक्कम मोठी आहे. थकीत वसुली न होण्याची अनेक कारणे आहेत. यात नापिकी, शेतमालाला नसलेला भाव अशा अनेक अडचणींचा समावेश आहे. त्यामुळेच थकीत रक्कमेचा आलेख वाढता आहे. वसुली कमी करण्यासाठी महावितरणकडून अनेक योजना आणल्या गेल्या. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती फारसी चांगली नसल्याने वसुलीचे प्रमाण अजूनही कमीच आहे. गेल्यावर्षी महावितरणने कृषी धोरणांतर्गत महाकृषी अभियान सुरू केले. तीन वर्षे हे अभियान चालणार आहे. यात थकीत रकमेवरील व्याज व दंड माफ करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट : ‘महाकृषी’कडे शेतकऱ्यांची पाठ
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

शेतकऱ्यांना पहिल्या वर्षात मूळ थकीत रकमेच्या केवळ ५० टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. दुसऱ्या वर्षात शेतकऱ्यांना मूळ थकीत रकमेच्या ७० टक्के तर तिसऱ्या वर्षात ८० टक्के रक्कम भरायची आहे. गेल्या वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरला. पावसाने शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले. त्यातून सावरत असतानाच कोरोना आला. यात हाती असलेले खर्च झाले. रब्बी हंगामही जेमतेम राहिला. अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आले नाही.

जिल्ह्यात जवळपास दीड लाख शेतकऱ्यांकडे कृषी पंपांच्या बिलाची थकीत आहे. यातील एक हजार ६१४ शेतकऱ्यांनीच योजनेत सहभाग घेतला. त्यांच्याकडे साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी होती. यातील साडेतीन कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावी लागली असून अडीच कोटी रक्कम माफ झाली. शेतकऱ्यांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याची मोठी संधी होती. मात्र, शेतकऱ्यांना यांचा लाभ घेता आलेला नाही.

कोरोनाचे संकट : ‘महाकृषी’कडे शेतकऱ्यांची पाठ
बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

विभाग - लाभार्थी - भरलेली रक्कम

पांढरकवडा - ६१ - दोन कोटी

पुसद - ४४६ - दोन कोटी

यवतमाळ - ५४७ - दीड कोटी

(Farmers neglect of Mahakrishi Yavatmal district news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com