पीक विम्याच्या रकमेएेवजी शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

अकोला : पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा झाले. परंतु, शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. पैसे गेले कुठे, या संभ्रमात शेतकऱ्यांनी बँकेचे दरवाजे ठोठावले तेव्हा कळाले की, बँकेने पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम म्हणून ते कापून घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हातात पीक विम्याच्या रकमेएवजी भोपळाच लागल्याची माहिती पुढे आली आहे. 

गतवर्षी मॉन्सूनचे उशिरा आगमन, पावसाचा लहरीपणा, सरासरीपेक्षा कमी पाऊस, कीडीचा प्रादुर्भाव इत्यादी आपत्तीमुळे खरीप व रब्बीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वर्षभर शेतमालाला हमीभावही मिळाला नाही. शासनानेही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास उदासीन धोरण अवलंबले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली. किमान पीक विम्याच्या रकमेतून काही नुकसान भरपाई होईल, याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, बॅंकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले पीक विम्याची रक्कम थेट पीककर्जाच्या एेवजी कापून घेतल्याने शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पडली आहे.

व्याजासंदर्भात शेतकरी अनभीज्ञ
पीककर्जाचा भरणा करण्याची मुदत माहिती नव्हती व ठराविक मुदतीनंतर पीककर्जावर किती व्याज लागेल याची माहितीसुद्धा बँकांकडून कधी देण्यात आली नाही. पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही याची चौकशी केली, तेव्हा पीक कर्जाच्या रकमेएवजी विम्याची रक्कम कापून घेण्यात आल्याचे, बॅंक अधिकाऱ्यांनी कळविल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

३० जुलैपर्यंत १.४६ लाख शेतकऱ्यांनी काढला विमा
जिल्ह्यात मागील वर्षी एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यावर्षी ३० जुलैपर्यंत दाखल अर्जांचा विचार केला, तर एक लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला अाहे. यात एक लाख १० हजार बीगर कर्जदार, तर ३६ हजार हे कर्जदार शेतकरी अाहेत.

Web Title: farmers not get crop insurance