राणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 14) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. नापिकीने त्रस्त शेतकरी डहाके यांच्यावर इलाहाबाद बॅंकेचे 90 हजार व स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे 95 हजार तसेच सोसायटीचे 95 हजार रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. यंदा कोरडवाहू पाच एकर शेतीत चारच पोते सोयाबीन झाले. या विवंचनेत त्यांनी शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची तक्रार त्यांचा मुलगा सतीश अशोक डहाके यांनी पोलिसांत दिली.

Web Title: Farmer's Suicide at Queen Amravati