दहावीच्या निरोप समारंभासाठी निघालेल्या विद्यार्थ्याने घेतला अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मित्रांच्या भेटीसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात दूदैवी मृत्यू झाल्याने सभारंभ स्थळी शोककळा पसरली होती. प्रज्वल राजूरकर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

चंद्रपूर ( गडचांदूर ) : दहावीचे वर्ष हे प्रत्येकच विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाचे आणि आयुष्याला वळण देणारे असते. वर्षभर अभ्यास करून परीक्षेच्या आधी इतके वर्ष ज्या शाळेत शिकलो, ज्या शिक्षकांनी शिकविले आणि ज्या मित्रांबरोबर एका वर्गात अभ्यास केला त्यांचा निरोप घेण्याची वेळ. शाळेचा निरोप समारंभ. पुढच्या आयुष्याची उत्सुकता आणि शालेय जीवनाला निरोप, अशी दोलायमान अवस्था. अशाच निरोप समारंभाला तो निघाला होता.

सविस्तर वाचा - अबब चक्‍क 825 कोटींचा घोटाळा, व्यवस्थापक फरार
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने निरोप समारंभाचे आयोजन केले होते. मात्र टपून बसलेला काळ याच विद्यार्थ्याची वाट पहात होता. मित्रांच्या भेटीसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात दूदैवी मृत्यू झाल्याने सभारंभ स्थळी शोककळा पसरली होती. प्रज्वल राजूरकर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आवाळपूर-गाडेगाव मार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाने जोरदार धडक

कोरपना तालूक्‍यात येणाऱ्या गाडेगाव येथील प्रज्वल ओमप्रकाश राजूरकर हा आवाळपुर येथिल पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. शाळेत दहावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सभारंभासाठी प्रज्वल दूचाकी आवाळपूरला निघाला होता. गाडेगावजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा
घटनास्थळीच दूदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fatal accident of Tenth student