वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईची तक्रार | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

minor daughter sexually abused by father
वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईची तक्रार

वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईची तक्रार

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) - शहरातील टिळकनगरातील एका निर्दयी वडिलांनी (Father) स्वतःच्या १२ वर्षांच्या मुलीवर (Girl) अत्याचार (Abuse) करून वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार (Complaint) दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून अत्याचार करणाऱ्या वडिलाला अटक केली आहे.

येथील टिळकनगरात अत्याचारी वडिलाचे कुटुंबीयांसह वास्तव्य आहे. त्याला १२ वर्षांची मुलगी आहे. या मुलीवर त्याची वाईट नजर होती. २९ डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास मुलीवर अत्याचार करण्याचा त्याने प्रयत्न केला. यानंतर पीडित मुलीच्या आईने सदर घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात केली.

हेही वाचा: भीषण अपघात : चार महिला ठार; तर पाच महिला गंभीर जखमी

मे २०२० मध्ये मुलगी स्वयंपाक घरात झोपली होती. मध्यरात्री वडिलांनी स्वयंपाकखोलीत प्रवेश करून मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेची आई त्याचवेळी स्वयंपाक खोलीत पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेली. तेव्हा वडील तेथून दुसऱ्या खोलीत निघून गेला. पीडितेच्या आईला शंका आल्याने मुलीची विचारपूस केली. तेव्हा वडिलाने बळजबरी करून अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.

मात्र, घरातील विषय चव्हाट्यावर न आणण्याचा निर्णय घेऊन पोलिसात तक्रार केली नाही. परंतु, त्यानंतरही वडिलांच्या वागण्यात कोणताच बदल झाला नाही. दुसऱ्यांदा प्रकार घडल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top