ट्रकवर दुचाकी आदळून पितापुत्र गंभीर 

father and son injured
father and son injured

अमरावती : अमरावती ते नागपूर महामार्गावर सावर्डी गावाजवळ भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या नादुरुस्त ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात पितापुत्र गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. 16) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. 
ताराचंद मेश्राम (वय 45) व मुलगा सनी ताराचंद मेश्राम (वय 14) अशी जखमी पितापुत्रांची नावे असून ते सावर्डी येथील रहिवासी आहेत. ताराचंद मेश्राम मुलगा सनीला रोज शाळेत सोडण्यासाठी व दूधविक्रीसाठी अमरावतीला येतात. बुधवारी (ता. 16) ते मुलासोबत मोटारसायकलने अमरावतीला येत होते. सावर्डी गावाजवळील पेट्रोलपंपासमोर एक ट्रक नादुरुस्त झाला. चालक व क्‍लीनर ट्रकच्या दुरुस्तीचे काम करीत होते. त्याचवेळी नियंत्रण गेल्याने मेश्राम यांची दुचाकी ट्रकवर मागून आदळली. त्यात पितापुत्र जखमी झाले. जखमींपैकी वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नांदगावपेठ पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com