बापलेकीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : कौटुंबिक वादातून वडील आणि मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वडिलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना कोतवाली परिसरात घडली. समीक्षा सुरेश डांगरे (वय 17, रा. नंदाजीनगर, कोतवाली) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश डांगरे (वय 45) हे पत्नी सुरेखा, दोन मुली आणि मुलासह नंदाजीनगरात राहतात. पती-पत्नी समोसा-कचोरीचा ठेला लावून व्यवसाय करतात. सुरेश यांना दारूचे व्यसन आहे. ते रोज दारू पिऊन घरी येऊन पत्नी व मुलांना त्रास देत होते. हा प्रकार त्यांची मोठी मुलगी समीक्षा हिला पटत नव्हता. त्यामुळे दोघा बापलेकींमध्ये अनेकदा वाद होत होते. शुक्रवारी रात्री साडेअकराला सुरेश हे दारू पिऊन घरी आले. ते आरडाओरड करीत होते. त्यामुळे समीक्षाने त्यांच्याशी ओरडण्यावरून वाद घातला. मुलीने ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या वडिलाने विषाची बाटली काढून प्राशन करण्याची धमकी दिली. रागाच्या भरात काही क्षणातच त्यांनी बाटलीतील काही विष प्राशन केले. वडिलाचा अवतार पाहून समीक्षाने धावत जाऊन वडिलाच्या हातातील विषाची बाटली हिसकावली. त्यानंतर पश्‍चात्ताप झाल्यामुळे तिनेही विष प्राशन केले. आई आणि बहिणीने आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांची मदत घेतली. शेजाऱ्यांनी लगेच बापलेकींना रुग्णालयात दाखल केले. सोमवारी मध्यरात्रीनंतर समीक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुरेश यांच्यावर मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father, daughter took poison