पित्याला उपाशी ठेवणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

अमरावती - वयोवृद्ध पित्याला त्यांच्या घरात मुलाकडून सौजन्याची वागणूक न देता उपाशी ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. नऊ) वृद्ध पित्याच्या तक्रारीवरून मुलगा अशोक शरद धेनुसेवक (रा. अमरनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वयोमानामुळे वडिलांकडून काम होत नव्हते. त्यामुळे मुलगा कामासाठी त्यांना सतत त्रास देऊ लागला. शिवाय, पित्यालाच मुलगा अशोक हा पैसे मागत होता. पैसे न दिल्यास त्यांना जबर मारहाणसुद्धा करायचा. हा त्रास वृद्ध पित्याने अनेक दिवसांपासून सोसला. याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. वृद्धाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा अशोकविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेषतः गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यांत अशा प्रकारच्या तक्रारी मागील सहा महिन्यांपासून केल्या जात आहेत. मुलांनी वडिलांना त्रास देण्याच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झाली आहे. त्यानंतर पोलिस समुपदेशनाने कुटुंबीयांना दिलासा देत आहेत.

Web Title: Father filed a criminal complaint against a child

टॅग्स