Murder : मुलीने धरला प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट; बापाने केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father killed daughter in wardha

मुलीने धरला प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट; बापाने केला खून

वर्धा : मुलीने प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने राग अनावर झालेल्या बापाने लाकडी काठीने मारून खून केला. ही घटना सेलू तालुक्यातील हमदापूर येथे बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली. प्रणाली विलास ठाकरे (१८) असे मृत मुलीचे नाव आहे. (Father killed daughter in wardha)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली ही ऑक्टोबर २०२१ मध्ये मामाकडे पाहुणी म्हणून आली होती. दरम्यान, तिचे येथील एका युवकाशी सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्न करण्याचेही ठरवले. मात्र, याला कुटुंबीयांकडून विरोध होणार असल्याचे लक्षात आल्याने दोघांनी पळ काढला होता. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्याने मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: ‘मला संबंध ठेवायला आवडत नाहीत’; पहिल्याच दिवशी पत्नीने केले स्पष्ट

मुलीला तिच्या कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यात आले होते. तेव्हापासून प्रणालीचे कुटुंबीयांशी पटत नव्हते. त्यांच्यात घरी नेहमी खटके उडायचे. दरम्यान, आज बुधवारी (ता. ११) दुपारी याच कारणातून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. मुलीने प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने चिडलेल्या बापाने लाकडी काठीने मुलीच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच दहेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे पाठविला. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला. याप्रकरणी आरोपी विलास ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास दहेगाव पोलिस ठाणेदार योगेश कामाले करत आहे.

Web Title: Father Killed Daughter Love Affair Crime News Wardha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :WardhamurderCrime News
go to top