ऐकतीस वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पित्याने शेतीसाठी केला ऐकतीस वर्षीय मुलाचा खून

टीम ई सकाळ
Friday, 27 November 2020

मंगळवारी (ता. २४) दुपारी दिनेश पेठमांगरूळीवरून खडक्‍याच्या शेतात गेला असता बारगांवजवळ दबा धरून असलेल्या दिलीपने मुलगा दिनेशच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री नागपूर येथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलीप पाचपोहरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

वरुड (जि. अमरावती) : शेतीच्या वादातून पित्याने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात बुधवारी (ता. २५) रात्री मुलगा दिनेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित फरार पित्यास अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील बारगाव फाट्यानजीक शेतीच्या वादातून दिलीप भाऊराव पाचपोहर यांनी मुलगा दिनेश पाचपोहर (वय ३१) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले. दिनेशवर नागपूर येथे उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

दिलीप पाचपोहर यांचे पत्नीसोबत पटत नव्हते. ३० वर्षांपासून ते विभक्त झाले होते. तेव्हा दिनेश सहा महिन्यांचा असल्यामुळे तो आईसोबत पेठमांगरूळी येथे राहत होता. अशातच दिलीपने दुसरे लग्न केले व तो दुसऱ्या पत्नी व मुलाबाळासह खडका येथे वेगळा राहत होता. त्याची पांढरघाटी येथे दोन एकर शेतजमीन आहे.

मंगळवारी (ता. २४) दुपारी दिनेश पेठमांगरूळीवरून खडक्‍याच्या शेतात गेला असता बारगांवजवळ दबा धरून असलेल्या दिलीपने मुलगा दिनेशच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री नागपूर येथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलीप पाचपोहरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

गळफास लावून युवकाची आत्महत्या

सडक/अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील रहिवासी ज्ञानेश्वर रामकृष्ण चांदेवार (वय २६) या युवकाने घरी बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सौंदड येथे बाजार होता. त्यामुळे घरातील सर्व बजरात गेले होते. नेमकी हीच संधी साधून ज्ञानेश्‍वरने गळफास लावून आत्महत्या केली. आई बाजारातून घरी परत आल्याने ही घटना उजेडात आली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father kills son over farm dispute