बापरे! न्यायाधीशांनाच चढ्यादराने खाद्यतेलाची विक्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

तेल्हारा शहरात लॉकडाउन दरम्यान किराणा व्यावसायिक चढ्यादराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करीत आहे. त्यामध्ये रविवारी सर्वसाधारण नागरिक म्हणून नेहमीप्रमाणे न्यायाधीश हे वस्तू खरेदीसाठी अरुण किराणा येथे गेले. दरम्यान त्यांनाच किंमतीपेक्षा अधीकच्या दराने खाद्यतेलाची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले, या स्थितीचा फायदा घेत येथील अरूण किराणा दुकान येथे चक्क न्यायाधीशांनाच चढ्यादराने खाद्यतेलाची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.5) सकाळी साडेदहा वाजता उघड झाला. पुरवठा विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी संचालक सुरेश भयाणीसह नऊ जणांवर गुन्हे दाखल केल्याने परिसरातील जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

हेही वाचा- ... म्हणून ‘गावरान’वर वाढला जोर अन् आले पोलिसांच्या रडावर 

काळा बाजार होत असल्याचे प्रकरण आले पुढे
तेल्हारा शहरात लॉकडाउन दरम्यान किराणा व्यावसायिक चढ्यादराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करीत आहे. त्यामध्ये रविवारी सर्वसाधारण नागरिक म्हणून नेहमीप्रमाणे न्यायाधीश हे वस्तू खरेदीसाठी अरुण किराणा येथे गेले. दरम्यान त्यांनाच किंमतीपेक्षा अधीकच्या दराने खाद्यतेलाची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यांनी यासंदर्भातील माहिती तहसीलदार, पुरवठा विभाग, पोलिस विभागला दिली. न्यायाधीशांच्या या आदेशाची गंभीर दखल घेत तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निलेश कात्रे, कारकून रामेश्वर भोपळे तसेच तेल्हारा ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश देशमुख यांनी धाड टाकून खाद्य तेलाची किंमत १५७ रुपये दर असताना चक्क १७० रुपयास विक्री करून काळा बाजारी होत असल्याचे प्रकरण पुढे आणले.

क्लिक करा- सात पिढ्यांच्या परंपरेत खंड; वाचा काय झाले असे?

दुकानदारांचे धाबे चांगलेच दणाणले 
दरम्यान दुकानात संचालक सुरेश चिमणलाल भयानीसह 10 व्यक्ती विना मास्क आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक निलेश कात्रे यांच्या फिर्यादी वरून अरुण किराणाचे संचालक सुरेश चिमणलाल भायानी यांची दोन मुले अंकित सुरेश भायानी व सचिन सुरेश भायानी सह दुकानातील मजूर विशाल किसन उजाड, (गाडेगाव), चांदमल मापावत (दहीगाव), पवन कैलास दुतोंडे, अजिंक्य फोकमारे, अनिल मधुकर बाहकर, प्रकाश कदम, अमर दुतोंडे सर्व रा. तेल्हारा अशा 10 व्यक्तीवर तेल्हारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाउनच्या काळातील ही तेल्हाऱ्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याने बड्या दुकानदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

मजुरांवर दखील गुन्हे दाखल
सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामूले मजुरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर संचालक सुरेश भायानी यांच्यावर चढ्यादरने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री केल्यामुळे कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
-विकास देवरे, ठाणेदार, तेल्हारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father! Sales of edible More expensively oil to the judges