
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन दखल घेत आहे. यामध्ये पोलिस प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून रात्रीच्यावेळी दारूचा साठा खेड्यात पोहोचविणारे सक्रिय आहेत.
संग्रामपूर (जि.बुलडाणा) : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात मद्य विक्रीला शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीही तालुक्यातील काही जणांनी गावागावात याचा फायदा घेत हातभट्टी व देशीदारूची चोरटी विक्री सुरू केली आहे.
प्राप्त माहितीनुसार देशीची पावटीने या काळात शंभरी ओलांडली आहे. शौकिनांना कोरोनाची कुठलीही भीती दिसत नाही. म्हणूनच ग्रामीण खेड्यात एकाच ग्लासने गावठी दारू पितांनाही दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन दखल घेत आहे. यामध्ये पोलिस प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून रात्रीच्यावेळी दारूचा साठा खेड्यात पोहोचविणारे सक्रिय आहेत. याची भनक तामगाव पोलिसांना लागताच 3 व 4 एप्रिल रोजी पोलिसांनी खिरोडा व पळशी झाशी येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी घातल्या. त्यात मोहाचा सडवा नष्ट करून दारू रसायन जप्त करण्यात आले व सदर आरोपीविरुद्ध तामगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा - मी दिसताच मुलगी रडते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही
खिरोडा येथे हातभट्टी सुरू असल्याची (ता.3) माहिती मिळताच ठाणेदार भूषण गावंडे यांनी पथकासह गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून 100 डब्बे नष्ट केले. खिरोडा परीसरात गावरान दारूचे हातभटटी उद्ध्वस्त केले. त्यानंतर त्यांच्याकडून देशी दारुच्या पावट्या व रसायन हस्तगत करून सदर आरोपीविरुद्ध कारवाई केले. तसेच (ता.4) एप्रिल रोजी पळशी झाशी गावाच्या बाहेरील एका शेतात हातभट्टीची दारू व त्याच्या साहित्य व बाकीचे डब्बे आणि गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.
आवश्यक वाचा - सात पिढ्यांच्या पडला परंपरेत खंड; वाचा काय झाले असे?
या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. मात्र, दुसरीकडे या लॉकडाउनचा फायदा घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात आहे. गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून हजारो लिटर रसायन जागेवरच नष्ट केले. या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हयामध्ये पीएसआय श्रीकांत विखे, पाहेकॉ तिवारी, पोहेकॉ माळी, पोहेकॉ साळवे, अंकुश गुरुदेव, पोकॉ बहादुरकार, शिवा कायंदे, ठाकरे तसेच होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रमाणेच परिसरातील इतर ठिकाणीही गावठी दारू व देशी विक्रीबाबत पोलिसांना लक्ष द्यावे लागेल.
बंद काळात देशी येते कोठून?
सगळीकडे लॉकडाउन असताना ग्रामीण भागात देशी दारूच्या पावट्या येतात तरी कोठून याचा तपास पोलिसांसाठी आव्हानच म्हणावे लागेल. कारण शासनमान्य देशी दारूचे दुकानातील साठ्याची नोंद असते. त्या नोंदी तपासून पाहणे ही गरजेचे बनत आहे. सोबतच देशीची साठवणूक कुठे केली जाते. या साठी सक्रिय असलेले रॅकेट ही तपासणे आवश्यक बनत आहे.