'त्याला' घरासमोर उभा बघून मुलीच्या बापाला आला राग अन घडली थरकाप उडवणारी घटना.. वाचा सविस्तर  

रुपेश खैरी 
Tuesday, 28 July 2020

येथे राहणाऱ्या अतुल दुधकवरे या तरुणाला शेजारी राहत असलेल्या शिवाजी पाटमासे यांच्या मुलीवर प्रेम जडले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ही बाब शिवाजी पटमासे यांना लक्षात आल्यावर त्यांना याला विरोध दर्शवला.

कारंजा (जि. वर्धा) : अनेक जण  प्रेमात पडतात कालांतराने त्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. मात्र असे नशीब प्रत्येकाचे असेलच असे नाही. कुटुंबाच्या विरोधामुळे कित्येक प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींना त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याच प्रेमामुळे एखाद्याला जीव गमवावा लागला तर? अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे.  

येथे राहणाऱ्या अतुल दुधकवरे या तरुणाला शेजारी राहत असलेल्या शिवाजी पाटमासे यांच्या मुलीवर प्रेम जडले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ही बाब शिवाजी पटमासे यांना लक्षात आल्यावर त्यांना याला विरोध दर्शवला. त्यात अतुल आणि शिवाजी पाटमासे यांचा वादही झाला. पण त्यानंतर असे काही घडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.  

अतुल आणि शिवाजी पाटमासे हे एकाच परिसरात एकमेकांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. यातून अतुल आणि परिसरातील या तरुणीचे आपसात प्रेमसंबध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली. त्यांनी या मुलाचा शोध घेत आठ दिवसांपूर्वी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतरही मुलीच्या प्रेमसंबंधाचे भूत शिवाजीच्या डोक्‍यात कायम राहिले. 

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...

वादाचा राग त्याच्या डोक्‍यात असताना काल रात्री अचानक अतुल घरासमोर उभा असल्याचे दिसले. यामुळे संतापलेल्या शिवाजी पाटमासे याने धारदार शस्त्राने भोसकून अतुलचा खून केला. यात तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडून पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

जखमी अवस्थेत रिक्षासायकलने नेले रुग्णालयात
 
अतुलला घरात जखमी केले असता आईने आरडाओरडा केला. बाजूला मित्र असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी सायकल रिक्षाने नेण्यात आले. मात्र, रुग्णालय घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. यात अतुल गंभीर जखमी झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला. 
 

जाणून घ्या - 'नको त्या अवस्थेत' सापडलेल्या पत्नी व प्रियकराचा खून

अवघ्या 10 मिनिटात आरोपी पसार

अतुलला ठार करणारा आरोपी अवघ्या 10 मिनिटात पसार झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. घटनेच्या वेळी रात्र होती. पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलिस पोहोचले. पण, त्या पूर्वीच आरोपी पसार झाला. पोलिसांनी रात्रभर शोध घेतला मात्र कोठेही आरोपी सापडला नाही.  

 संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father took major step against daughters boyfriend in wardha