बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न 

crime_woman
crime_woman

नागपूर : दारूड्या बापाची वाईट नजर 17 वर्षांच्या मुलीवर पडली व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आईकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रतापनगर पोलिसांनी जी. राजेश (वय 58) या बापाविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

राजेशला पत्नी आणि दोन मुली आहेत. तो हातमजुरी करतो. त्याचप्रमाणे त्याला दारूचे व्यसन आहे. 22 जानेवारीला रात्री 11 च्या सुमारास पीडित मुलगी, तिची आई व बहिणीसोबत जमिनीवर झोपली होती. त्यादिवशी राजेश दारूच्या नशेत होता. मोठी 17 वर्षाची मुलगी लघुशंकेसाठी बाहेर गेली असता तिच्या पाठोपाठ बापही गेला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रतिकार केला आणि ही माहिती मुलीने आपल्या आईला दिली. परंतु, पोलिसात तक्रार केल्यास आपलीच इभ्रतीचे वाभाडे निघतील, म्हणून तिच्या आईने वडीलावर आरडाआरड करून पुन्हा असे न करण्याचा दम दिला.

बुधवारी सकाळी राजेशने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला असता तिला हातबुक्कीने मारहाण केली. मोठ्‌या बहिणीने मध्यस्थी केली असता तिलाही मारहाण केली. नेहमीच्या या कटकटीला कंटाळून अखेर पीडित मुलीने प्रतापनगर पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून राजेशला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com