बाल कवींच्या काव्यसंग्रहात शेतकरी बापाच्या वेदना आणि मायची ममता

संदीप रायपूरे
बुधवार, 15 जानेवारी 2020

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरचे चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकवरचे हे गाव गोंडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी नावाच गांव. येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. गेल्या काही वर्षापासून शाळेला प्रयोगशिल शिक्षक लाभले. अन ही शाळा काही मोजक्‍या उत्तम शाळांपैकी एक ठरली.

गोंडपिपरी : हे तर त्यांच खेळण्याच वय. शाळा झाल्यावर वेळ मिळेल तसा अभ्याय करायचा अनं मनसोक्त जगायच. पण या चिमुकल्यांना आपल्या शेतकरी बापाच्या वेदना कळल्या. मायेच्या ममतेची जाणीव झाली. अनं गरीबीचे चटके समजले. विद्यार्थ्यानी या वेदना शब्दबद्ध केल्या. या अप्रतिम प्रतिभेची जाणीव एका मास्तरांना झाली अनं शब्दांकूर फुलले........! काल औरंगाबाद येथे या चिमुकल्यांनी शब्दबद्ध केलेल्या कवितासंग्रहाचे शानदार प्रकाशन झाले. अन त्यांच्या कविता बघून सारेच थक्क झाले.
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरचे चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकवरचे हे गाव गोंडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी नावाच गांव. येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. गेल्या काही वर्षापासून शाळेला प्रयोगशिल शिक्षक लाभले. अन ही शाळा काही मोजक्‍या उत्तम शाळांपैकी एक ठरली.
शाळेतील काही विद्यार्थीनींनी सुरवातीला कविता रचल्या. चिमुकल्या विद्यार्थीनींच्या प्रतिभेची जाणीव दुशांत निमकर,राजेश्वर अम्मावार या शाळेतील युवा शिक्षकांना झाली. अन मग सुरू झाला विद्यार्थ्यांच्या कवितेचा संग्रह करण्याची तयारी.शाळेच्या मुख्याध्यापक कारेकार,स्वत साहित्यीक असलेले अरूण झगडकर यांनी निमकर व अम्मावार या शिक्षकांच्या कल्पनेला सहकार्य करण्याचे ठरविले.

सविस्तर वाचा - गोरेवाडा जंगलाला आग

शाळेतील एकूण 40 विद्यार्थ्यांचा समावेश असलेला कवितासंग्रह ब-याच परिश्रमानंतर साकारला गेला. काहींनी आपल्या कवितातून बळीराजाच्या वेदना मांडल्या. तर काहीनीं मायचे ममत्वाला शब्दाच्या प्रतिभांची गुंफन रोवली. काहींनी आपल्या कवितेतून शालेय जिवन रंगविले. गरीबीने कुंटुंबाची झालेली वाताहात अनं यातून त्यांच्या वाटयाला आलेले चटकेही चिमुकल्यांनी शब्दबद्ध केले. कुणी आपल्या गावाची विशेषता मांडली तर आपल्या प्रिय भावाचे प्रेम कवितातून व्यक्त झाले. समाजजीवनाला प्रभावित करणारे चिमुकल्यांनी मांडलेल्या कवितातून अखेर शब्दांकुर फुलले.
काल औरगांबाद येथे एका कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लिहीलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोबाईलच्या जमान्यातही साहित्याशी गटटी करणा-या चिमुकल्यांनी या प्रयोगातून एक चांगला संदेश समाजाला दिला आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या या प्रयोगाचे अनेकांनी कौतूक केले आहे.

कवितासंग्रह तयार करण्याची कल्पना सुचली.
काही विद्यार्थीनीनीं अतिशय चांगल्या कविता रचल्या. त्या मी बघितल्या. अनं कवितासंग्रह तयार करण्याची कल्पना सुचली. शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सामाजिक जाणीवेच्या लिहीलेल्या कवितांचा आम्ही शब्दांकूर नावाचा कवितासंग्रह तयार केला.
दुशांत निमकर,शिक्षक,जि.प.उच्च प्राथ शाळा भं.तळोधी

अनेकांचे सहकार्य

विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रह तयार करतांना अनेकांचे सहकार्य लाभले. या कविता अनेक विद्यार्थ्यांसह व्यवस्थेला प्रेरणा देणा-या ठरतील. सोबतच साहित्याविषयीची आवड निर्माण करण्यास मदतगार ठरतील.
राजेश्वर अम्मावार,शिक्षक,  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father"s pain in chiidren's poem