
रामनगर पोलिसांना तशी सूचना दिली. दहा ते पंधरा मिनिटाच्या आत पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यानंतर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चंद्रपूर : वरोरा नाका चौकात एका युवकाने बंदूक दाखवून काही युवकांना धमकविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल आले. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी चंद्रपूर शहरामधील वर्दळीचे ठिकाण असलेल्या वरोरा नाका चौकात एक युवक मित्र मंडळींसोबत फिल्मी स्टाईलने गाडीतून फिल्मी स्टाईलने उतरला. चौकात उभे असलेल्या तीन-चार तरुणांना आपल्या कंबरेत असलेली बंदूक काढून दम देण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळी तिथून युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे, निखील बजाज आणि राहुल चव्हाण हे जात होते.
त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तरुणाला पकडले. रामनगर पोलिसांना तशी सूचना दिली. दहा ते पंधरा मिनिटाच्या आत पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यानंतर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर तरुणाला पोलिस ठाण्यात तपासणीसाठी घेऊन गेले. पोलिसांनी बंदुकीची पाहणी केली. ती छऱ्याची बंदूक निघाली. ती इंदोर येथून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
शहरातील वरोरा नका चौकात एक युवक मित्रांसोबत बसला असताना नकली बंदूक दाखवत परिसरात वातावरण तापविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पकडले. मात्र, ती बंदूक नकली निघाल्याने चांगलाच हसा झाला.
संपादन - नीलेश डाखोरे