क्रिकेट विश्वातील रायझींग स्टार्सचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

अकोला - क्रिकेटमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वर्षाखालील, शालेय तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अकोल्यातील रायझींग स्टार्सचा अकोला क्रिकेट क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

अकोला - क्रिकेटमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वर्षाखालील, शालेय तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अकोल्यातील रायझींग स्टार्सचा अकोला क्रिकेट क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वप्रथम रणजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी बजावणाऱ्या रवी ठाकुर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर इंग्लंड दौरा आणि एशिया कपसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व, तसेच विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन नळकांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १९ वर्षाखालील विश्व करंडकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधत्व आणि रणजी स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या आदित्य ठाकरे याला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी त्याचे कौतुक करण्यासाठी त्याची आई देखील उपस्थित होती. या नंतर डावखुरा फलंदाज म्हणून १९ वर्षाखालील विविध स्पर्धांमध्ये थक्क करुन सोडणाऱ्या अथर्व तायडेचा सन्मान करण्यात आला. अथर्वची धरमशाला येथे शिबिरासाठी निवड झाल्याने, त्याचा सन्मान त्याच्या पालकांनी स्विकारला. यानंतर विद्यापीठ तसेच शालेय स्तरावर क्रिकेट विश्वात उगवत्या स्टार्सचा देखील गौरव करण्यात आला. यामध्ये नयन चव्हाण, पवन परनाटे, मोहीत राऊत, अंकुश वाकोडे, रेहान ठेकीया, प्रणव आठवले, वैभव लांडे, प्रबल चौखंडे, संकेत डिक्कर, समीर डोईफोडे, इम्रान कमाल, गणेश भोसले, आहान जोशी, सिद्धांत मुळे, आकाश राऊत, पवन हलवणे आणि अमित माणिकराव यांचा सत्कार करण्यात आला. अमित माणिकराव यांची बीसीसीआय मध्ये व्हिडीओ अॅनालिस्ट म्हणून निवड झाली आहे.

अकोला क्रिकेटक्बल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.व्ही.पी. भाले होते. या प्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजयकांत सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानुभाई पटेल, विजय देशमुख, गोपाल भिरड, कैलाश शहा, ॲड. मुन्ना खान, भरत डिक्कर, दिलीप खत्री, शरद अग्रवाल, विवेक बिजवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागतानंतर सूत्रसंचालन पुजा काळे यांनी, तर प्रस्तावना भरत डिक्कर यांनी केले.

पालकांनी व्यक्त केले मनोगत

आपली मुलं क्रिकेट विश्वात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले असून, त्यांचा गौरव होताना पालकांचेही मन गहिवरले. याच सत्कार समारंभानिमित्त क्रिकेट विश्वातील रायझींग स्टार्सच्या पालकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Web Title: Felicitated Rising Stars of Cricket World