अमरावती येथून एका खळबळजनक हत्येची घटना समोर आली आहे. येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आशा घुले असे आहे. त्या ३८ वर्षांच्या होत्या. आशा घुले यांची हत्या का आणि कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.