महिला मतदारांचे औक्षण करून स्वागत 

राजकुमार भीतकर 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

यवतमाळ  : मतदार म्हणून आपण विशेष आहोत. आपल्या मतदानाचे मोल अनन्यसाधारण आहे; म्हणून मतदान केलेच पाहिजे. मतदानात महिलांची टक्‍केवारी वाढावी म्हणून गेडमनगरात असलेल्या सखी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आलेल्या महिलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. 

यवतमाळ  : मतदार म्हणून आपण विशेष आहोत. आपल्या मतदानाचे मोल अनन्यसाधारण आहे; म्हणून मतदान केलेच पाहिजे. मतदानात महिलांची टक्‍केवारी वाढावी म्हणून गेडमनगरात असलेल्या सखी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आलेल्या महिलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. 
गेडमनगरमधील जिल्हा परिषद शाळेत सखी मतदान केंद्र आहे. घरी जणू काही शुभकार्य आहे, अशा पद्धतीने मतदान केंद्र सजविण्यात आले आहे. परिसरात रांगोळी काढली असून, फ्लॅक्‍स लावण्यात आले आहे. तसेच लहान बाळासाठी पाळणाघर घर आहे. नायब तहसीलदार रूपाली बेहरे स्वतः महिला मतदारांचे औक्षण करून पुष्प व दिवाळी शुभेच्छांचे ग्रीटिंग देऊन स्वागत करीत होत्या. अपंग महिलांची जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदानास आलेल्या महिलांना कापडी पिशव्या दिल्या जात असून, त्यांना प्लॅस्टिक पिशवी न वापरण्याचे आवाहन केले जात आहे. या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार केला असून, मतदान झाल्यानंतर महिला तेथे बोटावर लावलेली शाई दाखवून मतदान केल्याची सेल्फी काढताना दिसत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात आम्हा महिलांचाही मोलाचा सहभाग आहे, हेच सेल्फीतून दाखविले जात आहे. वशेष म्हणजे या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असून, त्यांनी गुलाबी रंगाचा गणवेश परिधान केलेला आहे. 

महिलांची टक्‍केवारी वाढावी असा यामागचा दुहेरी उद्देश आहे. जे महिला आणि सखी मतदान केंद्र आहे, ते सजविण्यात आले आहे. 
- रूपाली बेहरे, नायब तहसीलदार, यवतमाळ.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female voters welcome