दीपावलीनिमित्त रेल्वेची फेस्टिवल स्पेशल 

train
train

अमरावती : दीपावलीच्या पर्वावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी फेस्टिवल स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते शालीमार आणि नागपूर ते एलटीटी या मार्गावरून जाणाऱ्या स्पेशल ट्रेनचा थांबा बडनेऱ्याला देण्यात आला आहे. 
नागपूर एलटीटी ही फेस्टिवल विशेष ट्रेन वन- वे ट्रीप करणार आहे. 02032 क्रमांकाची ही सुपरफास्ट गाडी 23 ऑक्‍टोबरला रात्री 11 वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता ती एलटीटी कुर्ला (मुंबई) येथे पोहोचेल. नागपूरवरून सुटणारी नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर 3 वन वे फेऱ्या पूर्ण करेल. 01234 क्रमांकाची ही विशेष ट्रेन 24,26 आणि 28 ऑक्‍टोबरला दुपारी चार वाजता नागपूरवरून सुटेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8.20 वाजता सीएसटी येथे पोहोचेल. अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूररेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण व ठाणे स्थानकावर थांबणाऱ्या या गाडीला 14 स्लीपर आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहतील. 
सीएसटी टू शालीमार व्हाया बडनेरा 
सीएसटी ते शालीमार मार्गावरही फेस्टिवल सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सहा फेऱ्या करेल. सीएसटी ते शालीमार गाडी क्रमांक 82111- डाऊन ही 25 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी प्रस्थान करेल. रात्री 12.20 वाजता सीएसटीवरून सुटून शनिवारी सकाळी 9.30 मिनिटाला शालीमार येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 82112-अप ही फेस्टिवल स्पेशल ट्रेन 26 ऑक्‍टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत चालेल. प्रत्येक शनिवारी दुपारी 12.10 वाजता शालीमारवरून सुटून रविवारी रात्री 12 वाजता सीएसटी येथे पोहोचेल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चंपा, रायगढ, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर व संतरागाची स्थानकावर ही गाडी थांबेल. सेकंड एसीचा एक, थर्ड एसीचे आठ, 4 स्लीपर आणि 3 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहतील. सर्वच गाड्यांचे आरक्षण 16 ऑक्‍टोबरपासून खुले होतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com