esakal | रात्रं-दिवस पाऊस सुरू असताना नगर परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागली
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर : पावसात घुग्घुस नगरपरिषदेला भीषण आग

चंद्रपूर : पावसात घुग्घुस नगरपरिषदेला भीषण आग

sakal_logo
By
मनोज कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : दोन ते तीन दिवसांपासून शहरात पावसाची सुरू आहे. रात्रं-दिवस पाऊस सुरू असताना नगर परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागली. हा प्रकार बुधवारी सकाळी घुग्घुस येथे समोर आला. आगीचे कारण सीसीटीव्हीतून समोर येईल.

तब्बल २७ वर्षांनंतर ३१ डिसेंबर २०२० रोजी घुग्घुस नगर परिषद अस्तित्वात आली. घुग्घुसवासीयांच्या अनेक आंदोलनानंतर घुग्घुस ग्रामपंचायतीचे अखेर नगरपरिषदमध्ये रूपांतर झाले. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्तीसुद्धा झाली. नगर परिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले. मात्र, बुधवारी (ता. ८) पहाटे घुग्घुस नगर परिषदेच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अनेक महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी कायम! नॅककडून शिक्कामोर्तब

इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. परंतु, आगीच्या रौद्र रूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ गेला व महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलिस तपासात पुढे येईल. आग कशी लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र, या आगीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत काळात येथे ९ कोटी ५१ लाखांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. त्याचा तपास थंड बस्त्यात आहे. येणाऱ्या काळात ही फाईल उघडली जाऊ शकते. आगीत जळालेल्या कागदपत्रांत या कागदपत्राचा समावेश तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक मध्ये विकासकामांत अनेक भोंगळ कारभार झाल्याची तक्रारी करण्यात आली होती. त्या संदर्भातील दस्तऐवजही आगीत जळाले नाही ना, हा प्रश्न आहे.

loading image
go to top