esakal | नागपूर विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी कायम! नॅककडून शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी कायम! नॅककडून शिक्कामोर्तब

नागपूर विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी कायम! नॅककडून शिक्कामोर्तब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेने (नॅक) ‘अ’ श्रेणी दिली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून विस्कटलेली शैक्षणिक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना विद्यापीठाने ‘अ’ क्षेणी कायम राखली आहे. हे सामूहिक यश असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दोन ते चार सप्टेंबर या कालावधीत नॅक चमूने विद्यापीठास मूल्यांकन देण्याच्या अनुषंगाने भेट दिली होती. प्रशासनानेही कोरोना नियमांचे पालन करून भेटीचे उत्तम नियोजन केले होते. यासाठी विविध समित्या तयार केल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या भेटीत १२ विभागांचे सादरीकरण झाले तर दुसऱ्या दिवशी १५ विभागांनी सादरीकरण केले.

हेही वाचा: राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर

समितीने विद्यार्थी, पालक, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी नॅकच्या चमूने संवाद साधला. त्याचबरोबर विविध विभागांना भेटी, प्रयोगशाळा पाहणी, पायाभूत सुविधा, ग्रंथालय भेटी देण्यात आल्या. यामध्ये अध्ययन व अध्यापन प्रणाली आणि संस्थात्मक मूल्ये आणि उत्तम उपक्रम विद्यापीठासाठी उपयोगी ठरल्या.

विद्यापीठाला नॅककडून ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल ते नॅक टीमच्या प्रत्यक्ष भेटीचे विशेष नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या आयक्यूएसी सेल आणि सर्वच घटकांनी अथक प्रयत्न केले. सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. विद्यार्थ्यांना उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि संशोधन सुविधा प्राप्त करून देणारी संस्था बनवण्याचे ध्येय आहे.
- डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू

हेही वाचा: लसीकरणानंतरही ११ विद्यार्थ्यांना कोरोना; अचानक रुग्णवाढ

विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा सन्मान मिळावा यासाठीची जोरदार तयारी केली होती. विद्यापीठातील एकूण शैक्षणिक वातावरण, विकासकामे, संशोधन आणि विद्यापीठातील असलेल्या सोयी सुविधा, शैक्षणिक विकास, ऑनलाइन परीक्षा पद्धती, आभासी शिक्षण तसेच संशोधनात्मक प्रगती या सगळ्याचे सादरीकरण विद्यापीठाकडून करण्यात आले होते.

राजनाथ सिंगांना निमंत्रण

विद्यापीठ सुरू करणार असलेल्या संरक्षणविषयक अभ्यासक्रमाच्या उद्घाटनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. अद्यापही त्यांच्या कडून कोणताही निरोप आलेले नाही. विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहे.

loading image
go to top