
नियमाचा भंग झाल्यास सभागृह सील करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात फिरताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. याचा भंग करणाऱ्यांवर पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीच्या शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच गुरुवारीच वर्ध्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. तसेच एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्त आढळल्यास कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना...
नियमाचा भंग झाल्यास सभागृह सील करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात फिरताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. याचा भंग करणाऱ्यांवर पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेली असून पाचच्या वर गर्दी केल्यास कारवाई होणार आहे. रात्री सातच्या आत दुकाने बंद करावे, असे निर्देश प्रशासनाने यावेळी दिले. अत्यावश्यक सेवेसाठी ही वेळ रात्री 9.30 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती आणि नगरपालिका हे शहरात आणि तालुक्यात या काळात नियंत्रण ठेवणार आहे. पुन्हा संचारबंदी करण्याची वेळ पडू नये, म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.