उष्माघाताचे पन्नास रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - उपराजधानीसह पूर्व विदर्भ चांगलाच तापू लागला आहे. यामुळे गॅस्ट्रोपासून इतरही रुग्णांची संख्या वाढल्याचे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील आकडेवारीवरून दिसून येते. वातावरण बदलाचा परिणाम व्यक्तींवर होत असून, आजपर्यंत उपराजधानीत तब्बल 50 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरवर्षी मे महिन्यात उपराजधानीचे तापमान 45 वर पोहोचते. शहरात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने तापमान घटले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अचानक तापमान वाढले. वातावरणातील बदलामुळे तापासह गॅस्ट्रो, अतिसाराचे रुग्ण वाढल्याचे दिसून येते. मेडिकल, मेयो, आयसोलेशन रुग्णालयातच गेल्या दहा दिवसांत 150 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक गॅस्ट्रोसदृश रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे होणे अपेक्षित आहे, परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे खासगी व शासकीय रुग्णालयील 50 रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे उष्माघाताच्या अचूक आकडेवारीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिकेकडून शहरात नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी हीट ऍक्‍शन प्लान राबवला जात असताना शहरात आवश्‍यक ठिकाणी नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्याऊही नसल्याची माहिती पुढे आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने उष्माघाताच्या 50 रुग्णांची नोंद असल्याचे मान्य केले. 

Web Title: fifty patients with heat stroke