आमदाराच्या दोन बायका अन् फजिती ऐका

Fight Between Two Wifes Of BJP MLA Raju Todsam In Yavatmal
Fight Between Two Wifes Of BJP MLA Raju Todsam In Yavatmal

यवतमाळ : येथील आर्णी-केळापूरच्या एका आमदाराच्या दोन पत्नी एकमेकींना भिडल्या अन् कबड्डी बघायला आलेली सगळी जनता या भांडणाकडे वळली.

राजू तोडसाम हे भाजपचे आमदार आहेत. तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा येथे वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित केले होते. या सामन्यांना तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. यावरुनच दोघींमध्ये वाद होते. हा वाद नेमका कबड्डीच्या सामन्यादरम्यान उफाळून आला.

तोडसाम सध्या ज्या दुसऱ्या पत्नी सोबत राहत आहेत त्या भाजप च्या कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणी हे दोघे एकत्र सहभागी होत असे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे तोडसाम यांची पहिली पत्नी त्रस्त होती. या विषयावरुन काल दोघींमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर भररस्त्यात हाणामारीही झाली. 12 फेब्रुवारीला रात्री दहा दरम्यान हा प्रसंग घडला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com