कायद्याला झुगारून आई-वडिलांनी बाळाला दिले दत्तक; वय अवघे पंधरा दिवस, आजी-आजोबांनी आक्षेप घेतल्याने...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बिरारीस व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी अंती वडनेर पोलिस ठाण्यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी रितसर तक्रार दाखल केली. यानंतर बाळाचे जैविक आईवडील व ज्यांना पंधरा दिवसाचे बाळ दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

वर्धा : बाळाला दत्तक देण्यासाठी शासनाचा कायदा आहे. मात्र, हिंगणघाट तालुक्‍यातुल आई-वडिलांनी त्यांच्या पंधरा दिवसाच्या बाळाला दिल्ली येथील दाम्पत्याला दत्तक दिले. या संदर्भात बाळाच्या आजी-आजोबांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तक्रार केली. या तक्रारीवरून चौकशी करीत जिल्हा बाळ संरक्षण समितीच्या तक्रारीवारून बाळाच्या आई-वाडिलांसह दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यावर वडणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाच जून रोजी मध्यरात्री कुटकी येथील बालकाला दिल्ली येथील व्यक्तींना देण्यात आले होते. या संदर्भात नऊ जून रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे बाळाचे आजी व आजोबा यांनी तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच लगेच चौकशीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित प्रकरणाची माहिती गोळा केली व तो अहवाल महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेला पाठविण्यात आला.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बिरारीस व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी अंती वडनेर पोलिस ठाण्यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी रितसर तक्रार दाखल केली. यानंतर बाळाचे जैविक आईवडील व ज्यांना पंधरा दिवसाचे बाळ दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 80 व 81 नुसार ही कारवाई करण्यात आली. तसेच 27 जून रोजी बाळाच्या जैविक आई आणि वडील यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित प्रकरणामध्ये आयुक्तांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, नीलेश ब्राम्हणे व वडनेर पोलिस ठाण्याचे आशीष गजभिये यांनी सहकार्य केले.

अधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

पोलिसांची चमू दिल्लीला रवाना

पंधरा दिवसांचे बाळ दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याच्या शोधात पोलिसांची चमू दिल्लीला रवाना झाली आहे. यावेळी बाळ ओळखण्यासाठी आई-वडिलांना सोबत घेण्यात येणार असल्याची माहिती बाळ सरंक्षण कक्षाच्या माधुरी भोयर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File a case against the parents