निरपराध तरुणांवर गुन्हा दाखल 

निरपराध तरुणांवर गुन्हा दाखल 

नागपूर - गंगाजमुनात अज्ञात आरोपींनी मारहाण केल्यानंतर केवळ आकसापोटी इरफान शेख या युवकाला फसविण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला. गुन्ह्यात इरफानचे नाव न घेतल्यास खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी दिली. इरफान नावाच्या युवकाने मारहाण केल्याची बळजबरीने कबुली देण्यास पोलिसांनी भाग पाडल्याची माहिती आसिफ खान या युवकाने पत्रकार परिषदेत दिली. 

14 एप्रिल 2019 रोजी रात्री सव्वानऊ वाजता रिक्षामधील काही प्रवासी गंगाजमुना पोलिस चौकीजवळ उतरले. त्यांनी पैसे दिले नाही. पैशासाठी त्यांच्यापाठोपाठ गेलो. काही लोकांनी येऊन मला मारहाण केल्याने बेशुद्ध झालो. त्यानंतर माझ्यावर मेयो रुग्णालयात उपचार करून लकडगंज पोलिस ठाण्यामध्ये आणले. तेथे इरफान नामक युवकाने मारहाण केल्याची तक्रार करण्यासंदर्भात लकडगंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दबाव टाकला. नकार दिला असता 50 हजारांचे आमिष दिले. पोलिसांच्या दबावाला बळी पडून कोऱ्या कागदावर सही केली. खोट्या जबाबाचा वापर करून निरपराध तरुणाला पोलिसांनी फसविल्याचे कळल्यावर लेखी निवेदन दिल्याचे रिक्षाचालक आसिफ खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लकडगंज पोलिसांनी केलेल्या या प्रकरामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. 

पैशासाठी काहीपण! 
काही दिवसांपासून गंगाजुमनातील "सेक्‍स वर्कर्स'कडून लकडगंज पोलिस "पठाणी वसुली' करीत आहेत. त्यामुळे गंगाजमुनात आलेले, विशेष करून बाहेरराज्यातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी पोलिसांचे लक्ष्य असतात. अशा युवकांना पकडून कारवाई करण्याची भीती दाखवून पैशाची मागणी करतात. बदनामी टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी पैसे देत असल्याची चर्चा आहे. 

निरपराध युवकावर पोलसांनी बळजबरीने 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केल्या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करू. यामध्ये कुणीही दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करू. 
-राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्‍त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com