अखेर जि. प. शाळेला मिळाले शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

पांढरी - येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १३ विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांनी शाळेतून काढले. तथापि, ‘विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला उतरती कळा‘ शीर्षकाखाली ३१ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने शाळेत एका शिक्षिकेची नियुक्ती केली आहे.    

येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत चालू सत्रामध्ये शाळेची पटसंख्या २४५ होती. येथून माध्यमिक विभागाचा एक विषय शिक्षक व एका सहायक शिक्षकांची बदली झाली. या रिक्तपदांवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. इयत्ता पाचवीच्या १३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतून दाखले काढले. सध्या २३१ विद्यार्थी आहेत. मागील दोन वर्षांपासून येथील जिल्हा परिषद शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. यातच या सत्रामध्ये एक विषय शिक्षक व एक सहायक शिक्षक पद रिक्त असल्याने विद्यार्थी पटसंख्येची घसरण सुरू झाली आहे. सकाळच्या वृत्ताची दखल घेत सडक अर्जुनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २ ऑगस्ट रोजी विषय शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश दिले. ६ ऑगस्ट रोजी शिक्षिका ए. व्ही. वलथरे शाळेत रुजू झाल्या.

Web Title: Finally, Dist.School teachers received