अखेर "त्या' मजनूविरुद्घ विनयभंगाचा गुन्हा दाखल 

kidnaping
kidnaping

यवतमाळ : यवतमाळमध्ये नुकतीच एक फिल्मीस्टाईल घटना घडली. एक महाविद्यालयीन तरुणी रस्त्याने जात असताना कारने तिचा पिच्छा करीत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. तरुणीच्या प्रसंगावधानाने आणि सतर्क नागरिकांमुळे हा प्रसंग टळल्याचे कळते. अखेर या मजनूविरुद्घ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

शरीर सुखाची मागणी

सुमित खांदवे (वय 24, रा. उत्तरवाढोणा, ता. नेर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयात शिकत असलेली एक विद्यार्थिनी मंगळवारी (ता.24) येथील आयुर्वेदिक रुग्णालयाजवळ आली असता, सुमित खांदवे हा पांढऱ्या रंगाची कार घेऊन पाठलाग करीत तेथे पोहोचला. कारचा दरवाजा उघडला व विद्यार्थिनीला गाडीत बस, असे सांगत शरीर सुखाची मागणी केली. मुलीने लगेच समयसुचकता दाखवीत आरडाओरड केली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे त्या मुलाचा पळून जाण्याचा बेत फसला.

"मै रघू का भाई हू'

नागरिकांनी तरुणाला बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी "मै रघू का भाई हू', असे फिल्मिस्टाइल उत्तर त्याने दिले. काही मिनिटे तरुण बाहेर आला नाही. मात्र नंतर संधी साधून खांदवे याने पळ काढला. नागरिकांनी पाठलाग करून मजनुला पकडून चोप दिला आणि अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी रात्री उशिरा सुमित खांदवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

...इथेही राजकीय दबाव 

विद्यार्थिनीची छेड काढणारा सुमित खांदवे हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मजनूला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात दबावतंत्र वापरले. मात्र, नागरिकांचा रोष बघता रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात ऐकायला मिळाली. 

कहाणीत काश्‍मिर प्रकरणाचे धागे 

काश्‍मिरच्या विद्यार्थ्यांना काही महिन्यांपूर्वी एका तरुणाने मारहाण केली होती. त्यावेळी सुमितने समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्याचा बदला म्हणून त्याला फसविण्यात आले, असे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न काहींनी केला.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com